कोणता झेंडा घेऊ हाती ?

IMG-20140721-WA0007
सध्या नारायण राणे ह्याचं नाराजी सत्र चालूच आहे.नारायण राणे ह्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला,मुख्यमंत्र्यांची कार्यप्रणाली संथ असून निर्णय क्षमता त्यांच्यात कमी असल्या कारणाने आपण राजीनाम देत आहोत अशी वल्गना जरी त्यांनी केली असली तरी ,नाराजीचा सूर जरा वेगळाच वाटला.पक्षश्रेष्ठी दिलेला शब्द पाळत नाहीत असा ठपकाही राणे यांनी ठेवला.मुळात मुख्यमंत्री होण्याची सर्व खुबी राणेंमध्ये असूनही त्यांना नेहमी डावललं जात आहे हेही तितकं खर आहे.त्यामुळे नाराजीचे सूर आवळणे साहजिकच आहे.जर एखाद्या कार्यक्षम माणसाला त्याच्या कामाजोगे कार्य मिळत नसेल किव्हा क्षमता असूनही त्याला मुद्दाम डावललं जात असेल तर अशा प्रकारची नाराजी व्यक्त होण स्वाभाविक आहे.आता राणे ह्यांनी राजीनामा तर दिला आहे मात्र अजुन पक्षांतराचा निर्णय मात्र व्हायचाय,त्यामुळे राणे कुठल्या पक्षात जातील किव्हा स्वताचा पक्ष काढतील ह्याबद्दलच्या तोफा तूर्तास तरी थंडावल्या आहेत.