कोणतेही काम लगेच करा .

मनात असो किंवा नोकरी व शिक्षणात . तान कसा निर्माण होतो याचा कधीतरी विचार करणे गरजेचे असते .
एखादी गोष्ट जेव्हा करायला पाहिजे आणि प्रत्यक्षात ती केव्हा केली जाते यामध्ये पडणाऱ्या अंतर हे तांत्रिक अंतरच ताणतणाव वाढत असते खरे तर उद्योग क्षेत्रात गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करण्याची पद्धत अवलंबिण्यात आलेली असते मात्र
आपण ती प्रत्यक्ष जीवनात फारशी अवलंबत नाही म्हणजे एखादी गोष्ट जर केव्हातरी करायचे असेल तर ती आजच करुन पण टाकणे इष्ट असते पण अनेक जण तसे करत नाही.

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ती पाहत राहतात त्यामुळे होते काय की शेवटच्या क्षणापर्यंत ताण वाढत राहतो .
समजा तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट वाईट आहे त्याचा तुम्हाला त्रास होत आहे अशा वेळी त्याचा त्याग लगेच करावा त्यासाठी अमुक एखाद्या दिवसाची वाट पहाण्यात काय उपयोग ? पण वाटायला सोपे वाटणारे हे करत नाही व अनेक कटू प्रसंग निर्माण होतात.

कधी चुकीची गोष्ट घडली तर लगेच माफी मागा उगाच मनात ठेवून अपराधीपणाची भावना वाटून घेऊ नका उत्तम कल्पना सुचली आहे तर ती लगेच अमलात आणा नाहीतर दुसराच कोणी कल्पना राबविल.

मूर्ख व शहाणा दोघेही एकच गोष्ट करतात पण वेगवेगळ्या वेळी शहाणा ते लगेच करतो व मूर्ख नंतर करतो, त्यामुळे कोणतेही काम लगेच करा .

एखाद्या दिवशी करू असे म्हणून ते पुढे ढकलू नका अशा प्रकारचा दिवस अस्तित्वात नाही.
तो दिवस आज आहे . तर उद्या आलास तर मी उद्या ला सांगेल ती गोष्ट मी कालच केली आहे या प्रमाणे जीवन जरा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल