कोवलम (Kovalam)

कोवलम
कोवलम बीच – केरळ पर्यटन स्थळ

समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोवलमला जायलाच हवं. कोवलमचे बीच फारच सुंदर आहेत. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी आवर्जुन जायला हवं. तुम्हाला जरी अँडव्हेंचर करायचं नसेल तरी सुद्धा येथील निसर्ग सौंदर्य पाहायला तुम्ही जायला हवं. याशिवाय येथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे तुमच्या केरळ दौऱ्यामध्ये एक दिवस कोवलमला द्यायलाच हव्यात.

पाहण्यासारखी ठिकाणं

समुद्र बीच पार्क, लाईट हाऊस बीच, कोवलम बीच, विझहिमजॅम मंदिर

कोवलममध्ये करण्यासारख्या गोष्टी

कोवलम हे ठिकाण वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अगदी हमखास वॉटर स्पोर्टससाठी जा.