कोवळ्या फणसाची भाजी

Jackfruit-Curry-Recipe

साहित्य :-

१)       कोवळा फणस

२)      भिजवलेले वाटाणे किंवा शेंगदाणे किंवा हरभरे

३)      गोडा मसाला , तिखट , मीठ , गुळ

४)      ओलं खोबरं अर्धी वाटी

५)     सुक्या लाल मिरच्या

६)       आवडत असल्यास कांदा व लसूण

कृती :-

१)      कोवळ्या फणसाचे काटे तासून टाकावेत .  फणसाच्या मोठया फोडी कराव्यात .

२)     त्या कुकरमध्ये उकडून घ्याव्यात .उकडलेल्या मोठया फोडी बारीक चिराव्यात वा ठेचाव्यात .

३)     भाजी चार वाटया असल्यास पाऊण वाटी तेलाची फोडणी करावी .  हिंग थोडा जास्त टाकून त्यात भिजवलेले वाटाणे वा शेंगदाणे टाकवेत .

४)     आवडत असल्यास लसणाच्या आठ-दहा पाकळ्या व एक वाटी बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा .

५)    त्यावर उकडलेली फणसाची भाजी , मीठ , गुळ , तिखट , मसाला सर्व घालून परतावी .  ओलं खोबरं घालावं .

६)      फोडणीत सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे अधिक चांगले लागतात .

७)    पूस भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाजीत सांगडी मिरचीसुध्दा चांगली लागते .  (फणस चिरताना आधी विळीला व हातांना तेल लावावं .)