क्रांतिसूर्य
|१८२७ सालात भारत देशात क्रांतीचा सूर्य उगवला स्त्रियाच्या जीवनात आशेचा किरण घेऊन आला.समाज्यामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी जन्म त्यांनी घेतला.
अहो !माणसातला माणूस त्यांनीच शोधला.ज्योतिबा म्हणती या नेत्याला असा महान
क्रांतीसूर्य या महाराष्ट्राच्या मातीत झाला.
आधी स्त्री होती अबला ज्योतीने केले तिला सबला त्याच्यांमुळेच प्रतिभाताई पोहचल्या राष्ट्रपती पदाला अन त्यांच्यामुळेच दिसतात.शिक्षिका शाळेत शिकवायला ज्योतिबा फुले ………
लहानपणीच ज्योती मातृप्रेमाला पोरका झाला.आयुष्यात प्रत्येक दिवस संकटे घेवून आल.अठराव्या शतकात महान प्रबोदंकार झाला. आजही त्यांच्या विचारांची गरज भासते देशाला ज्योतिबा फुले ………………….
किती अपमान सहन करून ज्ञानाचा सागर पार केला.
अज्ञानाच्या अंधारात स्त्रियांना ज्ञानाचा प्रकाश दिला दलितांसाठी ज्योतिबा आयुष्यभर लढला.अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद खुला केला.
ज्योतिबा झटत राहिला प्राण लावून पणाला
स्त्रियांसाठी ज्ञानाचा दरवाजा खुला केला.
अशा ज्योतीबाना पक्षघाताचा झटका आला.
तरीही डाव्या हाताने सार्वजानिक सत्यधर्म पूर्ण केला.
ज्योतिबा फुले.
भारतीय इतिहासात एक युगपुरुष झाला.
जीवनात नेहमीच सत्यधर्म आचाराला
आयुष्यात दुसरयाच्या हितासाठी जगला.
किती सांगू मी तुला क्रांतीसुर्याच्या लीला
ज्योतिबा फुले
१८९० मध्ये ज्योतिबा काळाच्या पडद्याआड गेला.
भारतावर फार मोठा दुखाचा डोंगर कोसळला.
महाष्ट्रातल्या खाणीतील हिरा हरपला.
स्त्रियांचा पिता,तर अस्पृश्याच्या कैवारी गेला.
ज्योतिबा फुले
किती कान्त सहन करून ज्ञानाचा दिवा लावला.
म्हणूनच तर महात्मा हा बहुमान मिळाला.
पण तरीही खंत वाटतेय माझ्या मनाला
का ज्योतीबांना भारतरत्न नाही मिळाला.
ज्योतिबा फुले.
– धनश्री जिभाऊ आहिरे