क्रांतीबा ज्योतिबा फुले

 

yotiba“विद्येविना मती गेली “
शिक्षणाची ज्ञान गंगा सर्वसामान्य बहुजनांच्या झोपडी झोपडी पोहचवून,शिक्षणाची खरी मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले,
ह्यांची जयंती काल उत्साहात पार पडली.
शिक्षणाने मनुष्य सज्ञान होतो,आणि व्यवहार चोखंदळ पद्धतीने हाताळतो असं त्याचं मत होत.
म्हणून अतिशय बिकट परिस्थितीत ज्या काळात बहुजनांना अस्पृश्यांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता,
स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा आणि शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता अशा काळात,
ज्योतीबांनी आपल्या सुविद्य पत्नी क्रांतीज्योती सावित्री बाईंना शिकवून सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.
पण ह्या मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी ज्योतीबांना अनेक हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या,
मात्र आपल्या कार्याची असलेली कास आणि,सावित्री बाईंची मिळालेली साथ ह्याच्या जोरावर ज्योतिबा शिक्षणाची मुहूर्तमेढ रोउ शकले.
शेतकऱ्यांचा आसूड,गुलामगिरी,ब्राम्हणांचा कसब ह्या ज्योतीबांचा साहित्याने  त्या काळी प्रचंड प्रमाणात परिवर्तन घडवुन आणले,
तसेच सनातन्यांचा रोषही ओढावून घेतला.
आपल्या घरासमोरील पाण्याचा “आड”अस्पृशांसाठी खूला करून समानतेची मोठी चळवळ ज्योतीबांनी उभी केली होती.
पुण्यानंतर अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या,त्यामुळे समाजातल्या ,तळागाळातल्या बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मिळाला,
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा ज्योतीबांची प्रबळ होती.
म्हणूनच,महाराजांच्या इतिहासावर १००० ओळींचा पोवाडा लिहुन “शिवचरित्र”घराघरात पोहोचविण्याच काम त्यांनी केलं.
म्हणूनच आजही ज्योतीबांची कीर्ती गाजत आहे आणि येणाऱ्या दिग्दिगंतात ती तशीच बहरत राहिलं,
त्यामुळे ज्योतीबांना तसेच सावित्री बाईंना मरणोत्तर “भारतरत्न”हा उच्च नागरिक सन्मान मिळावा ह्यासाठीची मोठी लढाई फुले प्रेमींकडून होत आहे …… ….
कारण फुले दाम्पत्यांच कामही तसच अद्वितीय आहे.
त्यांच्या पावन स्मृतीस आमचा सलाम.