खद्खद्या भात

Curd-Rice1

 

 

साहित्य :- 

१) एक कपभर तयार भात ( आदले दिवशीचा असला तरी चालेल . ) 

२) मीठ , बेताचं आंबट ताक अर्धी वाटी 

३) पाव चमचा हिंग , पाव चमचा जिरं , दोन-तीन मिरच्यांचे तुकडे .

कृती :- 

१) प्रथम भात जरा मोकळा करून घ्यावा .

२) नंतर त्यात मीठ , हिंग , ताक , जिरं , कढीपत्ता , मिरच्यांचे तुकडे घालावे .

३) भात आचेवर ठेवून चांगला खदखदू लागला की राहिलेलं ताक घालावं आणि खाली उतरवावा .  खदखद्या भात तयार !