खमंग ढोकळा

khaman dhokla

साहित्य :-

१)      तुरडाळ , मूगडाळ

२)     उडीदडाळ प्रत्येकी अर्धी वाटी

३)     हरभरा डाळ एक वाटी

४)     आले , मिरची

५)    लसूण , हिंग

६)      चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी

७)    खवलेले ओले खोबरे अर्धी वाटी

८)     आंबट ताक अर्धी वाटी

९)      थोडे तेल , चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      सर्व दली चार ते पाच तास भिजत टाकाव्यात .  मग त्यात मिरची , आले ,        लसूण टाकून त्या मिक्सरमधून बारीक वाटून घ्याव्यात .

२)     नंतर त्यात मीठ व आंबट ताक टाकून ते पीठ आंबवण्यासाठी ठेवावे .

३)     पीठ आंबल्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून ज्या भांडयात पीठ टाकावयाचे आहे त्या भांडयास तेलाचा हात फिरवावा व हे मिश्रण त्यात ओतून कुकरमध्ये मिश्रणाचे भांडे   ठेवून कुकर गैसवर ठेवावा .  शिट्टी लावू नये .

४)     सात ते आठ मिनिटे वाफ दयावी .  मग बाहेर काढून त्यास जिरे-मोहरीची फोडणी    दयावी .  वरून खोबरे व कोथिंबीर पसरावी .