खरे प्रेम
|खरे प्रेम असावे कमळासारखे,
जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,
त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही
खरे प्रेम असावे गुलाबासारखे,
जे ‘कोमल’ आणि ‘सुगंधी’ जरी असले,
तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही
खरे प्रेम असावे आकाशासारखे , विशाल व विस्तीर्ण
कुठेही गेले तरी न संपणारे .
सदैव आपल्या बरोबर असणार कारण
प्रेम हा काही खेळ नाही, टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही.
