खारा नारळी भात

coconut-rice

 

 

साहित्य :-  

१)      एक वाटीभर तांदूळ

२)     दोन मोठे चमचे तूप

३)     चार-पाच कांदे उभे चिरून

४)     नारळाच दुध दीड वाटी

५)    चार-पाच लवंगा

६)      चार-पाच दालचिनीचे तुकडे

७)    आवडीनुसार काजुपाकळ्या

८)     थोडे बेदाणे

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-  

१)      तांदूळ धुऊन ठेवावेत .  नंतर तुपावर लवंगा , दालचिनी घालून खमखमीत फोडणी करावी .

२)     थोडं आधण घालून भात शिजवावा . नंतर मीठ , नारळाच दुध घालावं .  काजुपाकळी , बेदाणे घालावेत .  

३)     कांदा तळून ठेवावा आणि ताटात भात वाढायला घेतो तेव्हा तळलेला कांदा पसरून घालावा .  

४)    तूप शक्यतो साजूक घ्यावं .  भाताला रंग हवा असल्यास हळद घालावी .