गजानना श्री गणराया
|
महाराष्ट्रातल्या धार्मिक संस्कृतीमध्ये अतिशय मानाचा आणि श्रद्धेचा सोहळा म्हणजे गणरायाचं आगमन…..
दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि १० व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला त्याच विसर्जन केलं जात.महाराष्ट्रा बरोबर गुजरात आणि गोव्यातही गणेश उत्सव मोठा आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.
गणपतीच्या ह्या दहा दिवसाच्या सोहळ्यासाठी अनेक गणेश मंडळे आधीपासून तयारीला लागतात,वर्गणी गोळा करून चौका-चौकात गणपती बसविला जातो ह्या सोहळ्यात दहा दिवस विविध कार्यक्रमे देखील मंडळांमार्फत राबविले जातात.सार्वजनिक गणेश उत्सवा बरोबरच घरी देखील गणरायाची स्थापना केली जाते,त्यात दीड दिवसाचा,३ दिवसाचा,५ दिवसाचा असा गणपती बसविला जातो.या काळात सर्वत्र चैतन्याच वातावरण असत.
आणि शेवटी अनंत चतुर्थीला गणरायाचं विसर्जन केलं जात.