गरोदर मातांनी रक्ताक्षय टाळण्यासाठी..

Silhoette1बाळाची चाहूल ही दाम्पत्य जीवनातील सर्वांत आनंदाची आणि महत्वाची गोष्ट! गरोदरपणाच्या ह्या दिवसात पोटातील बाळासोबत गरोदर मातेने स्वतःचीही काळजी घेणे आवश्यक असते. विशेषतः गरोदर स्त्रीला रक्तक्षय होण्याची शक्यता असते. मात्र काही खबरदारी घेतली तर हा धोका अगदी सहज टाळता येतो. यासाठी करावयाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे….

१)       सुरूवातीची तीन महिने सकस आहार व त्याचबरोबर फोलिक अँसिडच्या गोळ्या घ्या.

२)     गरोदर मातांनी त्वरित नजीकच्या प्रसूतिगृहात नाव नोंदणी करून तपासण्या करून घ्या.

३)     प्रतिबंधात्मक लोहयुक्त गोळ्या दुसर्‍या व तिसर्‍या त्रैमासिकात सुरू करा.

४)     रक्तक्षय आढळल्यास उपचारात्मक मात्रात लोहयुक्त गोळ्या घ्याव्यात.

५)      गंभीर स्वरूपाचा रक्तक्षय आढळल्यास लोहयुक्त इंजेक्शन व औषधोपचार मनपा/सरकारी दवाखान्यात विनामूल्य उपलब्ध आहे.  लोहयुक्त गोळ्या मनपा/सरकारी दवाखान्यात विनामूल्य पुरविल्या जातात.