गाजराची परतून भाजी

साहित्य :-carrot mung dal curry

१)      ताजी गाजरं पाव किलो

२)     तिखट एक चमचा

३)     ओलं खोबरं पाव वाटी

४)     मुठभर चिरलेली कोथिंबीर

५)    फोडणीचं साहित्य

६)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      गाजरं स्वच्छ धुऊन-पुसून त्याच्या पातळ चकत्या करून अर्धी पळी तेलाच्या फोडणीत घालून मंद आचेवर वाफवून घ्यावीत . 

२)     मग यात लाल तिखट व मीठ घालून परत एक मिनिट भाजी परतावी .  वरून खोबरं-कोथिंबीर घालावी .