गालफुगी

indexगालफुगी अथवा गालगुंड हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार जीवघेणा नसला तरीही दुर्लक्ष केल्यास श्रवणशक्ती कमी होणे, मेंदू किंवा हदय, मूत्रपिंडे किंवा सांध्यांना सूज येणे, काही मुलांच्या टेस्टीजला सूज येऊ शकते, स्वादुपिंड सुजल्यास कमालीची पोटदुखी होऊ शकते अशा समस्या भेद्सौ शकतात. ह्या आजाराचे प्रमाण शाळकरी मुलांमध्ये जास्त आढळते. हिवाळ्यात आणि वसंतऋतूमध्ये हा आजार दिसून येतो. ह्या आजारावर निश्चित उपचारपद्धती नसली तरीही ‘एमएमआर’ नावाची अत्यंत गुणकारी लास उपलब्ध आहे. ह्या आजारावरील काही फायदेशीर उपचार खाली देत आहोत,

१)       मुलांनी आईवडील सांगतील ती डॉक्टरांनी दिलेली औषधी नियमितपणे घ्यावीत.

२)     पातळ अन्नपदार्थ, मीठ-साखर पाणी, सरबत असे द्रवपदार्थ थोडे थोडे पण खूप वेळा घ्यावेत.

३)     सूज आलेल्या भागावर बर्फाने शेकल्यास बरे वाटू लागते.

४)     हा आजार झाल्यानंतर तो पूर्णपणे बरा होईपर्यंत मुलांना शाळेत न धाडणे श्रेयस्कर.

५)     ह्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी पंधरा महिन्यांच्या बाळाला ‘एमएमआर’ हि लास देणे अतिशय उत्तम.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *