गुटखा बंदी फक्त कागदावरच …।

GUTKHA

गेल्या वर्षी राज्य सरकारने गुटखा बंदीचा बिगुल जोरा -शोरात वाजला होता.
खेड्यापाड्यात,शहराशहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाया पण केल्या होत्या,मात्र हे सत्र काही दिवसानंपुरतच होत.
त्यानंतर आजपर्यंत कुठल्याच गुटखा विक्रेत्यावर कारवाई झाली नाही कि कुठे छापेमारी झाली नाही.
त्यामुळे सर्वत्र गुटखा सर्रास पणे विकली जात आहे तीही मोठ्या प्रमाणात……….
गुटखा बंदीचा आदेश हा तर उलट विक्रेत्यांच्या नाफाखोरीचा एक भाग होता अस म्हटल तरी वावग ठरणार नाही .
कारण बंदी नंतर गुटख्याच मूल्य आणी मागणी अधिक वाढली त्यामुळे. २ रु . ची गुटखा दुप्पट किमतीने विकली जात आहे.
आणी गुटखा बंदी आहे अस म्हणणाऱ्या वा मानणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या  कार्यालयाचे कोपरे गुटख्याच्या पिचकारीने पूर्णता रंगलेले दिसतात .
मसाला बार,जर्दा,खैनी,तंबाखू,विडी,सिगारेट ह्यांमुळे CANCER होतो अशी धोक्याची सूचना ह्या पदार्थाच्या RAPER वर दिलेली असतांना,ती दुर्लक्षित करून गुटखा खाल्ली जाते.
ह्यांमुळे सामाजिक आरोग्य पूर्णता धोक्यात आलेलं आहे,आणी प्रशासन मात्र बंदी जाहीर करून शांत झोपलं आहे.
आपल्या कडे कायदा होण्यासाठी मोठा संघर्ष केला जातो मोठ्या प्रमाणात मागण्या केल्या जातात,
मात्र तो कायदा पारित झाल्यावर त्याची अंमल बजावणी होत आहे कि नाही ह्याकडे मात्र कुणीच लक्ष देत नाही.
त्यात गुटखा बंदीही काही वेगळी नाही .

 

2 Comments