गुणकारी उसाचा रस….

  sugarcane   ‘कावीळ’ ह्या रोगावर वैद्यकीय उपचारांसोबतच काही ‘बाहेर’चे उपचारही केले जातात. मात्र, आपण आवडीने खात असलेला ऊस हा ह्या रोगावरील अत्यंत गुणकारी उपाय आहे! कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने आठवडाभर रोज एखाद-दोन ऊस चाऊन खाल्ले अथवा ३/४ ग्लास उसाचा रस पिला तर रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण ठणठणीत बरा होतो. ताज्या गुळवेलीच्या रसामध्ये २० ग्रॅम खडीसाखर मिसळून त्याचे सेवन केले तरीही कावीळ बरी होते. ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो गुणकारक ठरतो.  आम्लपित्त वाढललेल्यांनी ऊस खाल्ल्यास अथवा ऊसाचा रस पिल्यास पोट त्वरित साफ होते. तसेच ऊस जेवणापूर्वी खाल्यास पित्त वाढ होत नाही.

One Comment