गुणकारी काजू

Cashewकाजूचे खूप लाभकारी आहे .  थोडेसे काजू खाल्ल्यास शरीराला केवळ ऊर्जाच मिळत नाही तर विविध आजारसुद्धा दूर होतात.

१.काजूमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतात.

२.काजू पचण्यास हलके असतात.

३.काजूमध्ये आयर्न जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे त्यांनी नियमित काजू खावे.

४.काजू पाण्यात भिजवून बारीक करून मसाज केल्यास त्वचा उजळते.

५.काजू तेलकट असून त्वचेसाठी लाभकारी आहे.

६.जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती, लिंबू किंवा दही मिसळून चेहर्‍यावर लावल्यास चेहरा उजळतो.

७.काजू दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.

८.काजूमध्ये अँटीऑक्सिडंट असल्याने शरीराचे वजन संतुलित ठेवले जाते.

९.काही काम न करता थकवा जाणवत असल्यास काजू खावे. त्यामुळे तुमचा थकवा दूर राहतो, मूड चांगला राहतो. शरीरात शक्ती राहते.