गुणकारी टरबुज
|टरबुजची अत्यंत गुणकारी औषध म्हणून देखील या फळाची ओळख आहे. हृदयासाठी उपयुक्त ठरण्यासोबतच वियाग्राचे काही गुणसत्व देखील यामध्ये आहेत. शिवाय टरबुजाच्या बियांमध्ये देखील विविध गुणधर्म असल्याने शरिरासाठी अत्यंत उपयुक्त फळ म्हणून आयुर्वेदात या फळाचा उल्लेख आहे. वरतून काळा किंवा हिरवट रंग आणि आतुन लाल रंग असलेले टरबुज उन्हाळय़ाच्या दिवसांमधील एक महत्वपूर्ण फळ म्हणून ओळखले जाते. तापत्या उन्हामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. टरबुजामध्ये अंतर्गत पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने शरिरातील पाणी संतुलीत ठेवण्याचे काम टरबुज करते.मधुमेहाचा आजार असणार्या रुग्णांनाही टरबुज सेवण करता येते. शिवाय टरबुजामध्ये विटामिन ए, सी. आणि बी ६ हे जीवनसत्व आहेत. बीटा कैरोटीन नावाचे जीवनसत्व यामध्ये अधिक असल्याने हृदयाशी संबधीत आजार असलेल्यांसाठी टरबुज अधिक उपयुक्त ठरते.त्यामुळे टरबुज नुसतेच उन्हाची दाहकता कमी करणारे फळ नसुन गुणकारी औषध म्हणुन देखील शरिरासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा उल्लेख आयुर्वेदासह सध्याच्या वैद्यकीय शास्त्रातही आढळून येतो.