गुणकारी फणस

jackfriutकोकणात आंब्यानंतर सगळय़ात जास्त मागणी असणारे फळ म्हणजे फणस.. फणस खाण्यास अतिशय गोड असले, तरी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठीही फणस उपयुक्त फळ आहे. फणसला बाहेरून काटे असले तरी आत मधुर गोड गरे असतात.कच्च्या फणसाची भाजीदेखील केली जाते. एक कप कच्च्या फणसाच्या रसात साधारण १५५ कॅलरिज् आढळत. फणसातून आपल्याला ११ टक्क्यांपर्यंत फायबर मिळते. आरोग्यासाठी महत्त्वाचे जीवनसत्त्व ए, सी, रायबोफ्लेव्हिन, निअँसिन, थायमिन आणि फोलेट हे घटक फणसात आहेत. फणसामध्ये आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे मिळतात.

१.गरे डायबेटिस झालेल्यांसाठी चांगले असतात. कारण गर्‍यांमध्ये साखरेचे प्रमाण नसल्याने त्याचा परिणाम होत नाही.

२.फणसामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असून, कोलेस्ट्रॉल आणि चरबीवर नियंत्रण मिळते.

३.फणसातील पोषण द्रव्यांमध्ये कर्करोगविरोधी, क्षरणविरोधी आणि अल्सरविरोधी घटक असतात. त्यामुळे रोगांवर फणस गुणकारी ठरतो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *