गुणकारी मोहरी

mustardमोहरीउष्णस्वयंपाकघरात रोजच्या वापरात असणार्‍या मोहरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे. यामुळे उलट्या होऊन पोटातील विष बाहेर पडतं. रांजणवाडीचा त्रास होत असल्यास मोहरीचे पीठ ताकात मिसळून लावावे. मात्र याचा अंश डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. मोहरी कोड, खरूज आणि पोटातील जंतांवर गुणकारी ठरते. मोहरी अत्याधिक उष्ण आहे. त्यामुळे अतिरिक्तसेवन केल्यास आतड्याचे, जठराचे नुकसान होण्याची शक्यता असते. भूक वाढवण्यासाठी आणि अन्न पचनासाठी मोहरी उपयुक्त ठरते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *