गुरुपौर्णिमा
|+
“गुरु बिन कोण बतावे आज,बडा बिकट यम घाट”ह्या कबीरांच्या दोह्यात गुरूचा महिमा वर्णलेला आहे.माणसाच्या जीवनात गुरूला नेहमीच अनन्य साधारण महत्त्व दिल गेलं आहे.पुराणात देखील गुरुशिष्य परंपरा सांगितली गेली आहे.मुळात गुरु हि संकल्पना म्हणजे आपल्या समग्र आयुषाला कलाटणी देण्यामध्ये ज्या माणसाच्या प्रोत्साहनाचा महत्वाचा वाटा असतो,शिवाय माणसाच्या एकूण जडण-घडणीत ज्याचं मोल अधिक असत अशी व्यक्ति गुरु स्थानी असू शकते.
प्राचीन काळात तर गुरु परंपरेला खूप महत्त्व दिल जायचं,संत.महंत,ऋषी,साधु ह्या गुरूंच्या शृंखला असायच्या त्या आजही आहेत मात्र स्वयं-घोशितांच्या लबाडीमुळे ह्या परंपरेला जरा गालबोट लागलेलं दिसत.आपल्याला ज्ञानार्जन करणारे शिक्षक,संस्कार करणारे आई-वडील हे देखील आपले गुरूच आहेत ज्यांना कसलीच दक्षिणा लागत नाही.
छत्रपती शिवरायांना स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवायला लावणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब,गुरुत्वाच मुर्तीमत उदाहरण आहे.शिवाय गुरु कसा असावा हे तुकोबा,संत कबीर ह्यांच्या अभंगातून आपल्याला कळते.
त्यामुळे आपला गुरु कोण असावा कसा असावा हे आपल्या कार्यातून घडत असते.त्यामुळे प्रत्येकाला गुरु असावाच अस काही नाही,कामात परमेश्वर शोध,प्रयत्नात गुरु दिसेल.