गुरुवायुर
|गुरुवायुर मंदिर – केरळ पर्यटन स्थळ

केरळमध्ये गुरुवायुर नावाचे एक शहर आहे येथे असलेले गुरुवायुर मंदिर फारच प्रसिद्ध आहे. या मंदिरात कृष्णाच्या बालरुपातील मूर्ती आहे. या मंदिरात हिंदूशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कृष्णाचा अवतार मानणाऱ्यांना आणि कृष्णाची भक्ती करणाऱ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. हे मंदिर 500 वर्षे प्राचीन असून यावर करण्यात आलेले काम फार सुंदर आहे. गुरु, वायू आणि उर यापासून या परिसराला आणि मंदिराला नाव ठेवण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना बृहस्पति आणि वायूदेवाने केली असा मंदिराचा इतिहास सांगते. या मंदिरामध्ये कृष्णाची बालरुपातील मूर्ती असून कृष्णाच्या बाललिलया कोरण्यात आल्या आहेत.
पाहण्यासारखी ठिकाणं –
गुरुवायुरमध्ये अनेक मंदिर आहेत. मॅमयुर मंदिर, श्री चामुंडेश्वरी मंदिर,श्रीपार्थसारथी मंदिर, चावकाड बीच, कोटा एलिफंट कॅम्प ही काही ठिकाणे पाहण्यासारखी आहे.
गुरुवायुरमध्ये करण्यासारख्या गोष्टी –
येथील गुरुवायुर मंदिरात कायम गर्दी असते. मंदिर भेटी झाल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ येथील किनाऱ्यावर घालवू शकता.