गृहमंत्र्यांच्या पत्रातील ‘त्या’ ओळीबद्दल…..

ss       देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी लिहिलेल्या पत्रातील ‘ती’ ओळ वाचली आणि धक्काच बसला! ‘निरपराध मुस्लीम युवकांना चुकीच्या पद्धतीने अटक होता कामा नये……!’ आपण खरोखर एका ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्राचे नागरिक आहोत का? असा प्रश्न पडला! एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे एक जबाबदार गृहमंत्री ह्या नात्याने सुशीलकुमार शिंदेंनी ह्या पत्रात ‘निरपराध मुस्लीम’ ऐवजी ‘निरपराध नागरिक’ असा उल्लेख करायला हवा होता! मुस्लीम अथवा अल्प्संख्यच काय, कुठल्याही निष्पाप भारतीय नागरिकाला कुठल्याही गुन्ह्यात निष्कारण अटक होता कामा नये असे माझे स्पष्ट मत आहे!

मुस्लीम किंवा अल्पसंख्यच नाही तर कुठल्याही जन्सामुदायातील कित्येक निरपराध नागरिक त्यांना नाहक गोवल्या गेलेल्या गुन्ह्यात एकतर अटकेत किंवा न्यायालयात खेट्या मारत असल्याचे चित्र रोजच बघायला मिळते. कित्येकदा यात ‘चोर सोडून संन्याशालाच फाशी’ होतांना दिसते. हे कुठेतरी थांबायला हवे. त्याकरिता एखाद्या विशिष्ट जनसमुदायापेक्षा सर्वच ‘निष्पाप भारतीय नागरीकां’करीता काहीतरी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे!