ग्रीन पुलाव
|१) एक वाटी हिरवे वाटाणे
२) पाव वाटी काजूचे तुकडे
३) एक वाटी बासमती तांदूळ
४) वीस-पंचवीस कढीलिंबाची पाने
५) अर्धी वाटी कोथिंबीर
६) दोन-तीन हिरव्या मिरच्या
७) एक डाव तेल , चवीला साखर
८) दोन वाटया गरम पाणी
९) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) बासमती तांदूळ अर्धा तास अगोदर भिजवून ठेवावा . कोथिंबीर , मिरच्या व कढीलिंब यांची बारीक गोळी वाटावी .
२) तेल गरम करून काजू-वाटाणे टाकून परतून घ्यावे . तांदूळ टाकून परतावे .
३) वाटलेली गोळी टाकून परतून मीठ , साखर चवीला टाकून गरम पाणी टाकून मंद गैसवर भात होऊ दयावा . वरून थोडेसे तूप टाकावे .