‘ग्रॅण्डमस्ती’ मुळे आणखी खालावेल चित्रपटांचा दर्जा….

     grand-mastiदेशात रोजच समोर येणारी स्त्रियांवरील अत्याचाराची प्रकरणे पाहून ‘ग्रॅण्डमस्ती’ सारख्या भडक अश्लील दृश्य आणि संवाद असणाऱ्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यताच कशी दिली? असा सवाल सध्या विचारला जाऊ लागला आहे. ह्या चित्रपटातील संवाद आणि दृश्य इतके अश्लील आहेत की, त्याने तरुणांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ह्या चित्रपटातील संवाद आणि दृश्ये भारतीय संस्कृतीस मारक आहेत. ह्या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे भारतीय चित्रपटांचा दर्जा आणखीनच खालावला जाण्याचीही दाट शक्यता आहे. तरुणाईला चित्रपटांचे आकर्षण काही नवीन नाही. चित्रपटातील अनेक गोष्टींचे अनुकरणही तरुण लगेच प्रत्यक्ष जीवनातही करतांना दिसतात. अशा प्रकारचे चित्रपट बनविल्यामुळे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन आणखीनच जास्त खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     काही प्रबोधनपर विषय असणाऱ्या चित्रपटातील दृश्ये किंवा संवाद सामाजिक विद्वेष पसरविणारे ठरू शकतात असा ठपका ठेऊन चांगल्या चित्रपटातील दृश्यांना किंवा संवादांना सेन्सॉर बोर्ड कात्री लावते. त्यामुळे बऱ्याचदा चित्रपटाच्या मुळ विषयालाच धक्का बसतो. तेच सेन्सॉर अशा अश्लील चित्रपटांना कशी काय मान्यता देते याचेच आश्चर्य वाटते!

One Comment