घरगुती फेसपॅक

fase packसौंदर्य राखण्यासाठी आपण नव-नवीन प्रसाधनांचा उपयोग करतो .  काही घरगुती पॅकही उत्तम परिणाम देऊ करतात.

१.मैद्याच्या पॅक : २ चमचे मैदा, अर्धा चमचा हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा आंबेहळद, दोन चमचे दूध, थोडीशी साय यांचे मिश्रण लेपाच्या स्वरूपात चेहर्‍यावर लावावे. या पॅकमुळे सैल आणि निस्तेज त्वचा सतेज होते आणि त्वचेत ताठरपणा येतो.
२.कोंड्याचा पॅक : बरेचदा गव्हाचे पीठ चाळल्यावर उरणारा कोंडा फेकून दिला जातो. मात्र त्या कोंड्यात बरेच पौष्टिक घटक असतात. कोंडा दह्यात किंवा दुधात मिसळून पॅक तयार करावा आणि चेहर्‍यावर लावावा. हा पॅक स्क्रबरचे काम करतो. या पॅकमुळे त्वचा मऊ होतेच त्याचप्रमाणे कांतीही उजळते.
माणसाच्या शरीरासाठी सर्वात चांगले टॉनिक म्हणजे दूध. सौंदर्यवर्धनातही दुधाचा चांगला उपयोग होतो.