घरचा वैद्य…

सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. या परिस्थितीत बहुतांश लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असतो. अश्यावेळी डॉक्टरांकडे जाण्या आधी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम पडू शकतो.

त्यासाठी काही घरघुती उपाय खाली प्रमाणे.

फुटाणे खा 
खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात.

आल्याचा चहा 
सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

तुळशीचा पाल्याचा काढा 
चार-पाच तुळशीची पाने, तीन-चार लवंगा, दाेन वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,  थोडासा गवती चहा, चार कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या.

लिंबू आणि मध 
दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावे, खूप फायदा होतो.