घरच्या घरी फेशियल करा

images     हल्ली प्रत्येकजण आपल्या दिसण्याकडे विशेष लक्ष देत असतो. त्याकरीता ब्युटी पार्लर आणि मेन्स पार्लरच्या खेत्याही वाढलेल्या दिसतात. मसाज, फेशियल, ब्लीच असे नाना प्रकार चेहरा चांगला दिसण्यासाठी केले जातात आणि त्यावर वाटेलतेवढा खर्चही करण्याची तयारी असते. मात्र, ह्या खर्चाला कात्री लावतांना घरच्या घरी उत्तम रीतीने फेशियल करता येते. त्याबाबतची माहिती खाली देत आहोत.           

     कच्चे दूध व लिंबाचा रस एकेक चमचा कापसाच्याबोळ्यावर घेवून चेहर्‍याचे क्लिनजींग करावे.रवा व दही एकेक चमचा घेवून सर्व चेहर्‍यावर स्क्रबिंग करावे.यानंतर लोण्याने पूर्ण चेहर्‍यावर खालून वरच्या दिशेने मसाज करावा.बेसन व हळद गुलाब पाण्यात मिक्स करून त्याचेपॅक चेहर्‍यावर लावावे.फेसपॅक धुतल्यावर काकडीचा रस कापसाच्या सहाय्यानेसर्व चेहर्‍यावर लावावा. अशाप्रकारे घरच्या घरी मिळणार्‍यापदार्थांपासून घरीच फेशियल करता येते.

 

 

4 Comments