घराची सजावट करताना.

home-decoration-flowersकितीही महागड्या फर्निचरचा वापर केलेला असला, तरी घराच्या दर्शनी बाजूला फुलदानीत नेटकेपणाने सजलेली टवटवीत, ताजी फुले मन प्रसन्न करतात.. अशा फुलांचे मोल अमूल्य ठरते. हल्ली रोजच फ्लॉवर पॉट सजविणो वा फुले बदलणे तसे जिकीरीचे ठरते. काहीजणांनी अशा फ्लॉवर डेकोरेशनचा व्यवसायही सुरू केला आहे; पण अशी होम सर्व्हिस सर्वांनाच परवडते असे नाही.
फ्लॉवर पॉटमधली फुले जशी महत्त्वाची ठरतात, तितकाच फ्लॉवर पॉटही महत्त्वाचा असतो. हल्ली मार्बल पॉट, चिनी माती, फायबर, टेराकोटा, स्टिल, सिरॅमिक, ग्लास, वूडन, मड अशा विविध प्रकारचे फ्लॉवर पॉट बाजारात सहजपणे मिळतात. विविध आकारांच्या या पॉटमध्ये ठेवण्यात येणारी फुले नैसर्गिकच हवीत, असे नाही. आर्टिफिशीयल फुलेही यात छान सजविता येतात; मात्र कापडी, प्लास्टिकच्या या फुलांची निगराणी राखावी लागते. शक्यतो कर्टन वॉललगत, दोन भिंतींच्या मध्ये, प्रवेश दाराच्या दोन्ही बाजूला, किचन, बेडरुम, स्टडी रुम, लिव्हिंग रुममध्ये मोठाले फ्लॉवर पॉट ठेवण्याची पद्धत आहे. अनेकदा फुलांशिवाय नुसतेच डेकोरेटिव्ह अँटिक पिसही ठेवले जातात. कोणताही पॉट खरेदी करताना पडदे, भिंती, फर्निचर यांचे रंग, तो कुठे ठेवणार आहात ती जागा, किती जागा मिळणार आहे, हे लक्षात घेऊन फ्लॉवर पॉटची निवड करा.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *