घरातच शिकतात मुलं

parents and son

पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती रूढ होती, आजही आहे पण क्वचित. ह्या एकत्र कुटुंबपद्धतीत घरात आजी-आजोबा, आई-

वडील, काका-काकू अशी सज्ञान मंडळी एकत्र राहत असल्याने त्यांचे मुलांवर लक्ष असायचे. मुलांच्या आवडी-

निवडी, खेळ तसेच अभ्यास अशा गोष्टींवर लक्ष पुरविले जाई. मुलांवर चांगले संस्कारदेखील ह्यातून घडत.

मात्र, आता भौतिक गरजा वाढल्यामुळे वडिलांसोबत आईलादेखील नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते. मुलं

वाढत असतांना त्यांची काळजी तर घ्यावीच लागते, मात्र काळजीदेखील वाढते. मुलाचे मित्र, त्यांची घरं,

स्वभाव ह्याबद्दल पालक जागरूक हवेत. आइ-वडील व मुलगा यातील नातं मित्रत्वाचं असायला हवं. मुलाने आई-

वडिलांपासून काही लपवू नये असे वातावरण घरात असायला हवे. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची तसेच आपली

कौटुंबिक, सामाजिक व

असायला हव्यात. सामाजिक बांधिलकी जपनेदेखील; अत्यावश्यक आहे. आपण सुखवस्तू कुटुंबातील जरी असलो

तरीही आपल्या सभोवताली राहणाऱ्या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी.

परिस्थितीची जाणीव करून दया

आजच्या जगात स्त्री-पुरुष समान आहेत असे वर-वर दिसत असले तरी सत्य तसे नाही. पूर्वापार चालत आलेल्या

संस्कारातून आजही आपण मुक्त झालेलो नाही. दोघी मुले अथवा एक मुलगा-एक मुलगी लाभलेले पालक एका

विशिष्ट संभ्रमावस्थेत असल्याचे आपणास आढळते. मुलांविषयी विशिष्ट आत्मविश्वास आणि मुलींविषयी काळजी

वाटणारी मानसिकता आपणास बघावयास मिळते. मात्र त्यामुळे मुलींच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचते. मुलगा

असो वा मुलगी ती ईश्वरी देणगीच! मात्र त्यांच्यातील लिंगभेदामुळे आपण त्यांचे असे वर्गीकरण केले आहे.

वर्षानुवर्षे चालत आलेल्या सामाजिकतेचा परिणाम त्यांच्यावर झालेला दिसतो. त्यांनं तसेच वाढविले, संस्कारित

केले जाते. आपल्या रूढी, परंपरा, मुल्ये यांच्या जाणीवेने व्यक्तिमत्व विकसित होते. मुलांमध्ये आत्मविश्वास,

धैर्य निर्माण करायला हवे. तो लहान असतांनाच त्याच्या जबाबदारीची जाणीव त्यास करून द्याला हवी. कारण

उद्या तो शैक्षणिक कारणास्तव घरापासून दूर गेल्यावर कदाचित हि संधी आपल्याजवळ नसेल. त्यास योग्य

लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. सभोवतालच्या जगातील सकारात्मक गोष्टींची जाणीव त्यास करून द्यायला

हवी. त्यावर नकारात्मक परिस्थितीचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नेहमी चांगल्या

गोष्टींचाच आग्रह ठेवावा. त्याला स्वावलंबी बनवावे, वाचनाची आवड निर्माण करावी.

आर्थिक परिस्थितीची जाणीव मुलांना हवी व त्यानुसार त्यांच्या आवडी-निवडी, गरजा

मुलाच्या भावविश्वात जावे...

मुलं कधी मोठी होतात हे कळतच नाही. काल-परवापर्यंत रांगणारं बाळ आज धावायला लागलं याचच अप्रूप वाटतं. कालांतराने

ते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी घर सोडेल याबद्दल कुतूहल आणि खिन्नता दोघेही एकाच वेळी जाणवतात. मुलांच्या

जडण-घडणीतील वेग-वेगळ्या टप्प्यांची आठवण होते. अगदी ते तान्ह बाळ असल्यापासून तर महाविद्यालयात जाईपर्यंत काही

वेगळेपण जाणवत नाही. मात्र तो पौगंडावस्थेत आल्यानंतर त्याच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांमुळे मात्र वेगळेपण जाणवायला

लागते. तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेले असताना त्याच्या नवनवीन सवंगड्यांविषयी काळजी वाटायला लागते. तो

व्यसनाच्या आहारी तर जाणार नाही ना? अशीही शंका येते. मात्र त्याच्या भावविश्वात शिरून त्याच्या आवडी-निवडी,

त्याचा कोणत्या विषयाकडे कल आहे हे जाणून घ्यावे. त्याच्या मित्रांशी संवाद साधावा. मग तोही तुमच्याशी खुलेपणाने वागेल.

तुमच्यात मित्रत्वाचं, विश्वासाचं अतूट नातं तयार होईल.

मुलाने सज्जन माणूस बनावे….

आजकाल लोकांचा “एक मूल, सुंदर फुल” ह्याकडे विशेष कल दिसतो. बरेच पालक एकाच मुलावर समाधान मानतात. मात्र ते

मूल जर “मुलगा” असेल तर काही गोष्टींची सवय त्याला लहानपणापासूनच लावावयास हवी. लहानपणापासूनच त्याने आईला

मदत करायला शिकले पाहिजे. आगदी बाजार करण्यापासून तर स्वयंपाक घरातील मदतीपर्यंत. अशी मदत केल्याने काही

बिघडत नाही. साने गुरुजी देखील लहान असतांना आपल्या आईला घरकामात मदत करायचे. त्यावेळी त्यांच्यासमोर देवाने धारण

केलेल्या “अर्धनारी नटेश्वरा”चा आदर्श होता. पुढे ते एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उदयास आले. आजच्या महागाईच्या

जीवनात एकट्यानेच कमावणे पुरेसे नाही, पुढे चालून नोकरी करनारी बायको मिळाल्यावर तिला घरकामात मदत केल्याने

आपसातील सामंजस्य, विश्वास वृद्धिंगत होईल. आपल्या कष्टाची आपल्या नवऱ्याला जाणीव असल्याची भावना त्याच्या

बायकोमध्ये निर्माण होईल. आणि त्यांचा संसार आपसातिल दृढ विश्वासाच्या आधारे यशस्वीतेकडे वाटचाल करण्यास मदत

होईल. आईला घरकामात मदत केल्याने त्याचा इतर स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल. तो स्त्रीचा आदर

करावयास शिकेल.मूळ पैशाने श्रीमंत नाही झालं तरी चालेल मात्र आचार-विचार आणि वर्तुनुकीने तो श्रीमंत असावयास हवा.

मैत्री पुस्तकांशी…….!

पालकांच्या आपल्या मुलांविषयी अनेक कल्पना असतात. मात्र ते मूल एक चांगला नागरिक बनावा याकडे विशेष लक्ष

पुरविण्याची गरज आहे. लहाणपनापासून त्याच्यावर योग्य संस्कार होण्याची, त्याच्या अध्यात्मिक, विचारिक

विकासाची काळजी घेण्याची गरज असते. त्याला स्वावलंबी बनविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावे. त्याच्या

मनातील नकारात्मक विचार, कल्पना खोडून काढाव्यात. आजच्या धकाधकीच्या जीवनात निर्माण होणाऱ्या

अडचणींना सक्षमपाने सामोरे जाण्यासाठी त्याला कणखर बनवावे. त्याला मार्गदर्शन करतांनाच त्याच्याशी

मित्रत्वाचे नाते जपावे. त्याच्या प्रत्येक पावलामागे ठामपणे उभे रहावे. चांगल्या गोष्टींचे कौतुक करावे. त्याच्या

लहान-सहान प्रश्नांना योग्य उत्तरे द्यावीत. नव-नवीन शोध, घडामोडींविषयी त्याच्याशी चर्चा करावी. त्याचे

ज्ञान वाढवावे. नव-नवीन पुस्तके त्याला वाचावयास द्यावीत. जेणेकरून त्याच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण

होईल. म्हणजे शिक्षणासाठी वा अन्य कारणास्तव तो घराबाहेर पडला तरी त्याचे पाउल वाकडे पडणार नाही, कारण

पुस्तकरूपी मित्र सतत त्याच्या जवळ असेल.