घर सजवा लॅम्पने .

lamp-ideasघर सजविण्यासाठी आपण छोट्या-छोट्या वस्तू घेत असतो. कुठे काय चांगले दिसेल, याबद्दल आपण खुप च्युझी असतो. त्याचप्रमाणे इंटेरियर डेकोरेर्ट्स बोलावून घर कसे चांगले डेकोरेट करता येईल हे बघतो. आधी अभ्यासाला टेबल लॅम्प वापरत असत; परंतु आता अभ्यासाबरोबरच लॅम्पने घर कसे सजवता येईल, याकडे लक्ष दिले जाते. लॅम्पमध्येही वेगवेगळे प्रकार आले आहेत. कागदी लॅम्प, टेबल लॅम्प, वूडन लॅम्प, एलईडी लॅम्प आदी प्रकार आले आहेत; शिवाय आपल्याला हवा तसा लॅम्प आपण बनवूनही घेऊ शकतो. हॅालमध्ये फ्लोरोसन्ट लॅम्प, एलईडी लॅम्प, वूडन लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प आदी लॅम्प लावले जातात. जेणे करून लॅम्पच्या प्रकाशाने डोळ्यांना जास्त त्रासही होत नाही. त्याचप्रमाणे बेडरुम लॅम्पचे अनेक प्रकार आहेत. हार्ट लॅम्प, ब्रॅण्ड फ्लोअर लॅम्प, रेमी लॅम्प, पेपर लॅम्प आदी प्रकार आहेत आणि तेही वेगवेगळ्या आकारात काटरून, गुलाबाच्या फुलाच्या आकारामध्ये लॅम्प बाजारात बघायला मिळतात.
त्याचप्रमाणे अभ्यासासाठी किंवा काहींना रात्री पुस्तक वाचण्याचा छंद असतो. टेबल लॅम्पमध्ये गोल्डन रे लॅम्प, डेस्क लॅम्प, स्टॅण्ड लॅम्प, सेलिंग लॅम्प, क्लासिकल आदी लॅम्पचे प्रकार बघायला मिळतात. या लॅम्पमुळे डोळ्यांना त्रासही होत नाही. अँडजेस्टेबल असल्यामुळे हवा तसा अँडजेस्ट करता येतो. त्याच प्रमाणे या सगळ्या लॅम्पच्या किंमतीही तेवढय़ाच जास्त आहे. लोकांमध्ये त्याची क्रेझ जास्त वाढत चालली आहे.