घोळीची भाजी

Recipe-1781-Palak-Mushroom-Curry-9554

साहित्य :-

१)      घोळ एक जुडी

२)     कांदा एक

३)     तिखट आवडीप्रमाणे किंवा हिरव्या मिरच्या दोन

४)     दोन चमचे तेल

५)    फोडणीचं साहित्य

६)      चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      घोळीची भाजी निवडणं हा तसा त्रासदायक प्रकार आहे .  म्हणून बहुतेक गृहिणी ही भाजी टाळतात .

२)     पण चवीला छान लागते .  घोळीची पानं व अगदी कोवळी देठं निवडून , धुवून , निथळून चिरून घ्यावीत .

३)     फोडणी करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा .  हिरव्या मिरच्या घेणार असाल तर त्या कांद्याबरोबर परताव्यात .

४)     कांदा शिजत आल्यावर चिरलेली घोळ टाकावी .  चवीपुरतं मीठ घालावं .  मिरची न घातल्यास लाल तिखट घालावं व एक-दोन वाफा येऊ द्याव्यात .

५)    विदर्भात यात साखर घालत नाहीत .  पण किंचित साखर घातल्यास चांगली लागते .

६)      कधी कधी कांदा न वापरता त्यात डाळीचं पीठ घालून कोरडी भाजीही वरीलप्रमाणे करतात .