चटक मटक भात
|
साहित्य :-
१) दोन वाटया भात ( उरलेला शिळा भातही चालतो )
२) मीठ , अर्धा चमचा काळा मसाला
३) तिखट – झणझणीत किंवा कमी तिखट हवे असेल तसे
४) एक चमचा तेल , जिरं .
कृती :-
१) प्रथम भात चांगला मोकळा करून घ्यावा .
२) त्यात मीठ , तेल , तिखट काळा मसाला घालून चांगला कालवावा .
३) कालवताना गच्च गोळा होता कामा नये .