चायना हे वह…….
|
बाजारात फिरायला जा किवा कुठलीही वस्तू घ्यायला जा.बाजार तसा भरलेलाच असतो,कारण आपला भारत देश म्हणजे जगातील सर्वात मोठी बाजार पेठ असलेला देश आहे.त्यामुळे बाजार हे प्रत्येक भागात दुमदुमलेले दिसतात.आणि त्यात एक गोष्ट प्रकर्षाने दिसते आणि सर्रास मिळते ती म्हणजे made in china च्या electronic वस्तु.स्वस्तात आणि सर्वांच्या बजेट मध्ये असतील अश्या,नो ग्यारंटी असलेल्य…..
गेल्या काही वर्षात china वस्तुकांनी भारतीय बाजार पेठेवर आपली मजबूत पकड बसवली आहे,त्यामुळे तुम्ही कुठलीही स्वस्त वस्तु बघा त्यात त्यावर तुम्हाला made in china असंच लिहिलेलं दिसेल.चीनला भारतीय बाजार पेठ जिंकता आल्या असल्या तरी लोकांची विश्वासहर्ता मात्र जिंकता आली नाही.कारण china माल म्हणजे नो ग्यारंटी असा शिक्का मोर्तब त्यावर,आणि ग्राहकांच्या मनावर देखील झालेला आहे.
china मोबाईल आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
कारण मोठा आवाज असलेलं चार चार सिम कार्ड सामाऊ शकणारे china मोबाईल.आता फारसे विकले जात नाहीत कारण सध्या android सिस्टीम असलेले मोबाईल बाजारात मोठ्या प्रमानात विकले जात आहेत,शिवाय कमी पैश्यात सर्वच सुविधा आणि waranty मिळत असल्या कारणाने ग्राहकांचा ओघ स्मार्ट फोन कडे वळत आहे.
त्यामुळे china मोबाईल खरेदी कुणी करत असेल तर लोक म्हणतात अरे चायना हे वह…………………….
Right….. चायना है वह…..