चिंचेच्या पाल्याची भाजी
|१) चिंचेचा पाला बारीक चिरून तव्यावर थोडा गरम करून घ्यावा
२) वाल भाजून घ्यावेत आणि शिजवून घ्यावेत .
कृती :-
१) तेलाची मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी . त्यावर थोडा कांदा परतून घ्यावा . थोडा लसूण घालावा .
२) भाजी आणि वाल घालावे . थोडं पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी .
३) नंतर त्यात तिखट , मीठ आणि ओलं खोबरं घालून भाजी उतरवावी .
(चिंचेचा पाला तुरीच्या वरणातही घालतात . चिंचेच्या फुलांची चटणीही करतात .)