चिकन तंगडी कबाब

साहित्य :-chicken tandoori

१)      चार पुढचे चिकन लेग्ज

२)     एक अंडे , बटरचा चुरा

३)     आले अर्धा इंच

४)     चार ते पाच लसूण पाकळ्या

५)    दोन मिरच्या , एक वाटी कोथिंबीर

६)      तळण्यासाठी तेल

७)    चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      चिकन लेग्ज धुऊन त्याला थोडयाशा चिरा पाडाव्यात .  चिरा पडून झाल्यावर त्यास मीठ लावून थोडा वेळ ठेवावे . 

२)     लसूण पाकळ्या , मिरच्या , एक इंच आल्याचा तुकडा व एक वाटी कोथिंबीर एकत्र वाटून चिकन लेग्जला लावून ठेवावेत . 

३)     अंडे फेसून त्यात एक-एक चिकन लेग्ज बुडवून बटरच्या चुऱ्यात घोळून ठेवावे व दहा मिनिटांनी भरपूर तेलात तळून घेऊन ब्राऊन पेपरवर काढावेत . 

४)     ऐल्युमिनियम फाईलचा तुकडा चिकन लेग्जच्या टोकाला गुंडाळून खाण्यास दयावे .  उत्तम स्वादासाठी सॉसबरोबर खावे . 

One Comment