चीजी व्हेजिटेबल सॅन्डविच

साहित्य :-grilled-vegetable-sandwich-1

१)      सहा मोठया आकाराचे ब्रेड स्लाईस

२)     तीन चीज क्यूब

३)     थोडं लोणी

४)     दोन मोठे चमचे मेयॉनीज किंवा मलई (मोहरीपूड + लिंबाचा रस घालून)

५)    एक वाटी किसलेलं गाजर

६)      एक वाटी किसलेला कोबी

७)    थोडं मिरपूड

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      ब्रेड स्लाईसना नेहमीप्रमाणे लोणी लावून घ्यावं .  चीज किसावं . 

२)     गाजर , कोबी , चीज आणि मेयॉनीज एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ ,  मिरपूड घालावी . 

३)     हे सारण भरून नेहमीप्रमाणे त्रिकोणी आकाराचे सॅन्डविचेस तयार करावेत . 

४)     मेयॉनीज आवडत नसेल तर त्याऐवजी दोन मोठे चमचे मलई घोटून घ्यावी .  त्यात थोडी मोहरीपूड आणि लिंबाचा रस घालून ते वापरावं . 

५)    चिकन आवडणाऱ्यांनी याच साहित्यात एक वाटी वाफवलेलं चिकन घालावं .