चीज इडली
|
साहित्य :-
१) दोन वाटया इडली रवा
२) एक वाटी उडीद डाळ
३) दहा-बारा मेथी दाणे
४) अर्धी वाटी किसलेलं चीज
५) एक चमचा मिरपूड
६) एक चमचा लाल सुक्या मिरचीचा चुरा
७) थोडं अमूल लोणी
८) चवीला मीठ .
कृती :-
१) डाळ आणि रवा भिजत घालून त्या दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे घालावे .
२) उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटावी . डाळ वाटून होत आली की पाणी निथळून रवा घालून वाटावी .
३) त्यात मीठ घालून ती मोठया पातेल्यात झाकण ठेवून रात्रभर अडीचपट फुगेपर्यंत भिजत घालावी .
४) सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवून , इडली पात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रेत्येकात इडली पीठ टाकून इडल्या तयार कराव्यात .
५) तयार केलेल्या प्रत्येक इडलीला लोणी लावावं . वर चीज पेरून त्यावर मिरपूड आणि मिरचीचा चुरा पेरून १८० सेंटीग्रेडवर तापलेल्या ओव्होनमध्ये साधारण तीन-चार मिनिटं चीज वितळेपर्यंत ठेवाव्या . गरम गरम खायला दयाव्या .