चीज बटाटा
|१) चार उकडलेले बटाटे
२) दोन क्यूब चीज
३) एक टेबल स्पून बटर
४) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) बटाटे किसून घ्यावे . फ्राईंग पैनमध्ये बटर टाकून त्यात किसलेला बटाटा टाकून त्यात चीज किसून टाकावे व थोडेसे मीठ टाकून त्यात बटाटा चीजमध्ये मिक्स करून गोलाकार करून थापावे .
२) मंद आचेवर पैनठेवून भजावे . वरती झाकण ठेवावे . खालच्या बाजूने गुलाबी रंग आल्यावर हळूच हलक्या हाताने बटाट्याची खालची बाजू वर करून वरची बाजू खाली करून भाजावी .
३) दोन्ही बाजूंनी जरा कुरकुरीत भाजावे . केचपबरोबर किंवा नुसते पण चांगले लागते .