चुबक वाड्यांची भाजी

moong bhaji2

साहित्य :-

१)      हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी

२)     तिखट अर्धा चमचा

३)     ओवा एक चमचा

४)     धणेपूड पूड सव्वा चमचा

५)    जिरेपूड एक चमचा

६)      सांबार मसाला एक चमचा

७)    चिंचेचा कोळ एक मोठा चमचा किंवा तीन-चार आमसुलं

८)     गुळ एक मोठा चमचा

९)      चिरलेली कोथिंबीर पाव वाटी

१०)   कढीपत्ता तीन-चार पानं

११)    तेल अर्धी वाटीपेक्षा जास्त

१२)  फोडणीचं साहित्य , चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      एक वाटी डाळीचं पीठ भरपूर मोहन व थोडसं पाणी घेऊन त्यात एक चमचा  ओवा , हळद , मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घट्टसर मळून घ्यावं .

२)     एखादया खोलगट पातेल्यात किंवा कढईत हिंगाची फोडणी करून चार वाटया पाणी घालावं .

३)     पाण्याला उकळी आल्यावर त्यात मीठ , लाल तिखट , आमसूल अथवा चिंचेचा कोळ , एक चमचा साखर अथवा चवीपुरता गुळ घालून परत उकळी आणावी .

४)     पाणी उकळत असतानाच आपण ज्याप्रमाणे पिठलं करताना थोडं थोडं पीठ घालून ढवळतो त्याप्रमाणे थोडं थोडं पीठ घालून दाटसर रस्सा तयार करावा .

५)    हा रस्सा उकळत असतानाच त्यात कोथिंबीर घालावी आणि आधी मळून ठेवलेल्या डाळीच्या पीठाचे (सांगडे घालतो त्याप्रमाणे) छोटे छोटे गोळे उकळत्या रश्श्यात सोडावेत आणि दहा-पंधरा मिनिटं चांगले शिजू द्यावे .

६)      ही खमंग भाजी भात किंवा पोळी दोन्हीबरोबर चांगली लागतो .  खाली उतरल्यावर खोबऱ्याचा कीस आणि कोथिंबीरनं सुशोभित करावी .