चेहरा नेहमी तजेलदार राहण्यासाठी

fresh faceआपला चेहरा दिवसभर टवटवीत राहावा, नेहमी तजेलदार दिसावा असे सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी नेमकी कोणती युक्ती वापरावी हे बऱ्याच जणींना माहित नसते. मात्र आता काळजी करण्याचे काही कारण नाही! पुढे आम्ही काही टिप्स देत आहोत, ज्या तुमचा चेहरा नेमही तजेलदार दिसावा याकरिता निश्चितच उपयोगी पडतील!      

     चेहरा नेहमी तजेलदार दिसावा यासाठी भरपूर प्रमाणात फलाहार घ्यावा. जेवणातही फळभाज्यांचे प्रमाण जास्त असावे.रासायनिक द्रव्ये असलेली पेये, म्हणजेच कोल्डड्रींक्स, फास्ट फूटचे सेवन टाळावे.
     धुम्रपान, मद्यसेवन टाळावे.उन्हात घराबाहेर पडतानाचेहरा स्कार्फने झाकावा, परसट हॅट, फुल बाह्यांचा
शर्ट, सनकोट इ.चा वापर करावा.
     योग्य सनस्क्रीनचा वापर करावा. वारंवार कपाळावर आठय़ाकाढणे, राग व्यक्त करणेयामुळे सुद्धा कपाळावर
घड्या पडून व्यक्ती वृद्ध दिसू लागतो. म्हणून ह्या सवयी टाळाव्यात.  चेहरा टवटवीत ठेवण्यासाठीस्वच्छ पाण्याने धुवावा. प्राणायाम, विशेषत:चेहर्‍याच्या व्यायामाच्याविशिष्ट प्रकारांचा वापरकेल्यास निश्चितच फायदा होतो.

2 Comments