चॉकलेट शिरा

साहित्य :-chocalate

१)      एक वाटी रवा

२)     दोन चमचे साजूक तूप वा रिफाइंड तेल

३)     दोन चमचे कोको पावडर (किंवा चॉकलेट फ्लेवरचा बोर्नव्हीटा , हॉर्लीक्स असं काही) 

४)     साखर पाव वाटी

५)    दीड वाटी पाणी

कृती :-

१)      शिऱ्यासाठी करतो तसा रवा तुपावर अथवा रिफाइंड तेलावर खमंग भाजून घ्यावा . 

२)     एकीकडं दुसऱ्या भांडयात दीड वाटी पाणी घेऊन गैसवर पाक करण्यासाठी ठेवावं . 

३)     त्यात साखर पूर्ण विरघळली की , मग कोको पावडर दोन चमचे घालावी . 

४)     रवा भाजल्यानंतर हे मिश्रण रव्यात घालून व्यवस्थित हलवावं .  पाच     मिनिटं झाकून ठेवा .