‘जन धन योजना ‘

j
मोदीराज्यात जनतेसाठी नवीन काय असेल अशी उत्सुकता सर्वांनाच होती,त्यादृष्टीने आता नवीन पाऊल उचलले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “जन धन योजने’चे उद्‌घाटन झाले. एकाच दिवसात तब्बल दीड कोटी बॅंक खाती उघडण्यात आली.
या योजनेअंतर्गत लोकांना झीरो-बॅलन्स अकाउंट उघडून देण्यात येत आहे. त्यात रुपे डेबिट कार्ड मिळणार आहे. त्याशिवाय तीस हजार रुपयांचा जीवन विमा आणि एक लाख रुपयांचा अपघात विमाही मिळणार आहे. “एका दिवसात दीड कोटी खाती आणि एकाच दिवशी या दीड कोटी लोकांना एक लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध करून देऊन आपण इतिहास रचला आहे. अशाप्रकारे अनेक मुख्यमंत्री, मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि बॅंक अधिकाऱ्यांना सहभागी करून 77 हजार ठिकाणी कार्यक्रम करण्याचा इतक्याम व्यापक स्तरावरील कार्यक्रम केंद्रातील सरकारने पहिल्यांदाच रचला आहे,” असे मोदी यांनी नमूद केले. 26 जानेवारी 2015पर्यंत साडेसात कोटी लोकांना अशी खाती उघडून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आणि योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात सूक्ष्मनिवृत्तिवेतन (मायक्रो पेन्शन) सुविधा देण्याचेही उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले.
मुळात ह्या योजनेमुळे गरिबीची दरी कुठेतरी कमी व्हायला मदत होणार आहे.मोदींनी राबविलेली हि अभूतपूर्व योजना देश विकासाच्या दृष्टीने उचलेल महत्वाचं पाऊल आहे.

One Comment