जपा रेशमी साड्या
| हजारो रुपये खर्च करून आपण सिल्कच्या साड्या घेतो आणि त्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे थोड्याच दिवसात बोळा झालेला दिसतो.
म्हणूनच आपल्याला सिल्क साड्या खरेदी करावयाच्या असतील तर जरीऐवजी रेशमी धाग्यांच्या साड्या खरेदी कराव्यात. कारण जर काळी पडून साडीची रया जाते. किमती सिल्क साड्यांच्या मागे नेट अवश्य लावून घ्या. यामुळे हेअर पीनमध्ये अडकून त्यांचे धागे निसटण्याची भीती राहत नाही.
सिल्कच्या साडीला टेरिकॉटचा फॉल लावावा. सिल्क साडीला अरारूट वा तांदळाच्या पेजेची कांजी करण्याऐवजी डिंकाची कांजी करावी. साडीच्या रंगाची चमक कमी झाल्यासारखी वाटत असेल तर ती धुतल्यानंतर अर्धी बादली पाण्यात १ चमचा लिंबाचा रस मिसळा आणि १५-२0 मिनिटे साडी त्यात भिजत ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने पिळून वाळवा. साडी चमकू लागेल.
साडीवर चिकट डाग पडले असतील तर टाल्कम पावडर लावून चांगल्या प्रकारे चोळून उन्हात वाळवा आणि नंतर ईझीमध्ये धुवा. ग्रीसचा डाग काढण्यासाठी शाम्पू वापरू शकता. एक बादली पाण्यात ५-६ थेंब शाम्पू मिसळून साडी धुतल्यास डाग निघून जातात. सिल्क साडी ओलसर असतानाच इस्त्री करा. इस्त्री जास्त गरम करू नका. त्यामुळे रंगात फरक पडेल.