जलजन्य साथरोग टाळण्यासाठी हे करा..

imagesसाथीचे आजार हे मुख्यतः पाण्यामुळे पसरतात. दुषित पाण्याचा पुरवठा किंवा रहिवाशी भागाच्या आजूबाजूला साचलेली पाण्याची डबकी हि याची दोन प्रमुख कारणं. अशा रोगांना ‘जलजन्य साथरोग असे म्हणतात. कॉलरा, गॅस्ट्रो, हगवण, काविळ आदी जलजन्य म्हणजेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार आहेत. यापासून बचाव करण्यासाठी काही फायदेशीर उपाय पुढीलप्रमाणे,

१) घराच्या भोवताली पाणी, घाण साचू देऊ नका. म्हणजे माशा, डास यांची पैदास होणार नाही.

२) शिळे अन्न व नासकी फळे, तसेच सडका भाजीपाला खाऊ नका.

३) लहान मुलांना रस्त्यावर किंवा घरासमोर शौचास बसवू नका.

४) उघड्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका.

५) पाणी गाळून व उकळून स्वच्छ करून प्या.

६) सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करा.

७) गॅस्ट्रो, कॉलरा, हगवण, काविळ व इतर रोगांची लक्षणे  आढळताच वैद्यकीय उपचार घ्या.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *