जागतिक युवा दिन

YUVA-1आज जागतिक युवा दिवस आहे.जगातील एकुण लोकसंखेपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.
तरूण म्हणजे प्रचंड उत्साह,काहीतरी करून दाखवण्याची धडपड,तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अचाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात.मात्र
तरुण म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न जर एखाद्या जेष्ठ व्यक्तीस विचारला तर त्याचे उत्तर निश्चित हेच असेल कि बेधुंध वागणारी,व्यसनाधीनतेकडे झुकलेली सामाजातील वाया गेलेली पिढी म्हणजे तरुण पिढी असं ऐकावयास मिळते.मग प्रश्न पडतो खरचं तरुण इतके वाया गेले आहेत का?ज्या तरुणांच्या कर्तबगारीचा संपुर्ण जगणे उदो-उदो करायला ह्वा त्या तरुणांना एवढे लांछनास्पद समीक्षण का?खर तर ह्या गोष्टीचा विचार व्हायला हवा.
जगात तरुणांची संख्या अधिक आहे,त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे.आणि महत्वाचं म्हणजे जगातील ९०% तरुण हे सुसाक्षित आहेत. आज तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडत आहे.त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता,चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक….हि तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती हि तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे.