जिथे शिक्षकच अनुत्तीर्ण, तेथे विद्यार्थ्यांचे काय होणार?

download (1)बिहार राज्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांना साधे पाचवीचेही गणित येत नाही! गेल्या महिन्यात तिथल्या कंत्राटी शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालानुसार हि गंभीर बाब समोर आली आहे. ह्या परीक्षेत त्रेचाळीस हजार चारशे सत्तेचाळीस शिक्षक सहभागी झाले होते.त्यापैकी बत्तीस हजार आठशे तेहेतीस शिक्षक सर्व विषयात पास आलेत. चोवीस टक्के शिक्षक विविध विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यातही गणितात नापास होणाऱ्या शिक्षकांची संख्या दहा हजार आहे. ह्या परीक्षेसाठी इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली होती.

शिक्षकांच्या गुणवत्तेची पडताळणी करण्यासाठी घेण्यात आलेल्या ह्या परीक्षेच्या निकालातून शिक्षकांच्याच ज्ञानाचे वाभाडे काढले आहेत. बिहार राज्य तसे आर्थिक, सामाजिक आणि शिक्षणिक बाबतीत मागासले समजले जात होते. आता त्यात थोडीफार सुधारणा होतांना दिसत आहे. मात्र, ह्या घटनेमुळे बिहारमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता धोक्यात आली आहे हे नक्की. कारण, जर शिक्षकच ज्ञानात परिपूर्ण नसेल तर तो विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान कसे पुरवू शकतो?

One Comment