जीभ स्वच्छ ठेवा .

tungजिभेवरून व्यक्तीचा आरोग्याचा अंदाज बांधता येतो. जीभ अस्वच्छ असेल, जिभेवर पांढरट थर असेल तर अनारोग्याची खात्री पटते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन अस्वास्थ्याचा धोका वाढतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिक अथवा धातूची टंग क्लीनर्स मिळतात; पण धातूची वस्तू गंजण्याचा धोका असल्यानं काळजी घ्यावी. त्याऐवजी प्लॅस्टिकची टंग क्लीनर्स वापरणं चांगलं. सध्या टूथब्रशच्या मागंही जीभ स्वच्छ करण्यासाठी स्क्रबर दिलेला असतो. झोपताना आणि सकाळी जीभ स्वच्छ करण्यासाठी तो वापरावा. मुखाच्या दुर्गंधीला अस्वच्छ जीभही कारणीभूत असू शकते. रंग मिसळलेला कुठलाही पदार्थ खाल्ल्यास जीभ त्वरित स्वच्छ करावी, कारण जिभेवर कृत्रिम रंगाचा दुष्पपरिणाम होतो. कधीही टूथब्रशनं जीभ साफ करूनये. ग्लासभर पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका. या पाण्यानं दिवसातून ५-६ वेळा खळखळून चुळा भरा. यामुळे जीभ स्वच्छ राहण्यास मदत होईल. जीभ अस्वच्छ असेल तर डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *