जीवन संग्रामात ठामपणे उभे राहणे म्हणजे धर्म

एक अमेरिकन विचारवंत थायलंडमध्ये गेलात तेव्हा थायलंडमधील एक संन्यासी फार प्रसिद्ध होता.
पूर्ण जगभर त्याची प्रसिद्धी पोहोचली होती त्या अमेरिकन विचारवंताला वाटले की त्या संन्यास संन्यास आश्रम एखाद्या एकांत ठिकाणाच्या रमणीय पर्वतराजी मध्ये असेल

परंतु जेव्हा त्या आश्रमात प्रत्यक्ष पोहोचला तेव्हा आश्चर्याने थक्क झाला कारण एका गावातील गर्दीची वर्दळ असणाऱ्या भर बाजारपेठेत तो आश्रम होता

आज जाऊन पाहतो तो काय पाच पन्नास कुत्री तेथे निवांत फिरत होती .आपापसात भांडत होती आणि तेथील झाडावर शेकडो कावळे कर्कश्य रवा मध्ये काव-काव करीत होते . तो फारच त्रास झाला गुरूला म्हणाला तुम्ही आश्रमासाठी ही जागा का म्हणून निवडली आहे भर बाजारपेठेतील गर्दी आणि गोंगाटाने भरलेली?

गुरु म्हणाले मी मुद्दामच ही जागा निवडली आहे .जीवनातील शांती एकाग्रता कशी प्राप्त करावी याचे ज्ञान येथील योग्यरीत्या मिळू शकते . हे एकूण तो आणखीनच अस्वस्थ झाला त्याने त्या आश्रमाच्या गुरूला संन्याशाला म्हटले , मी गोंधळून गेलो आहे खरे तर तुमचा आश्रम एखाद्या पर्वतावर निवांत एकांत ठिकाणी असायला हवा होता येते तर कुत्री , कावळ्यांचा उच्छाद सुरू आहे

गुरु म्हणाले हि कुत्री कावळे येथे निमंत्रित आहेत . मी त्यांना रोज खायला घालतो त्यावर तो अमेरिकन म्हणाला पण मग एवढ्या सर्व गोंधळात येते शांती एकाग्रता कशी काय प्राप्त होणार?

गुरूने उत्तर दिले… येथे जो शांती मिळू शकेल व खऱ्या जीवनातील शांतीची प्राप्ती मिळू शकेल पर्वतावर एकांतात तर कोणीही शांत बसून शांती मिळवू शकतो परंतु ती शांती कायम टिकू शकत नाही .

खरा धर्म म्हणजे जीवनातील संघर्ष खरे धार्मिक होणे . म्हणजे जीवन संघर्षाचा प्रवाहात निर्धाराने ठामपणे उभे राहणे व त्याचबरोबर स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणे .