ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

PUNEअखेर विद्येच्या माहेरघराला विदेच्या देवतेची जाणीव झाली,जिच्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळात पोचली अशी ज्ञानदेवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले,ह्यांच्या नावाने आता पुणे विद्यापीठाची ओळख होणार आहे.

स्त्रीशिक्षणाची बीजे रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असा नामविस्तार करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी मान्य झाली. पुणे विद्यापीठानेही असा नामविस्तार करण्याचा ठरावमंजूर केला होता. अखेरीस आजच्या निर्णयाने ती मागणी मान्य झाली आहे.

समाजाचा स्त्रीशिक्षणास विरोध असण्याच्या काळात सावित्रीबाईंनी पुण्यात स्त्री शिक्षणाच्या शाळा काढल्या. सनातन्यांचा कडवा विरोध सहन करून त्यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या या कार्याची जाण ठेवून पुणे विद्यापीठाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र ती मान्य होत नव्हती. अखेरीस त्यासाठीआंदोलन पुकारण्यातआले, नामविस्तारासाठी स्वतंत्र समिती नेमण्यातआली. या रेट्याला यश येऊन पुणे विद्यापीठाने त्याबाबतचा ठराव केला. मात्र राज्य सरकार कडे तो ठराव पडून राहिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विद्यापीठ नामविस्ताराचा मुद्दा लावून धरला.

 

सरकार हा निर्णय घेण्यात टाळाटाळ करतअसल्याचा निषेध म्हणून त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडण्याचाआक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पुणे विद्यापीठ नामविस्तारावर चर्चा झालीआणि सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यास मंत्रिमंडळाने एकमताने सहमती दर्शविली. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथूनचदेशातल्या शिक्षणाचा पाया रचला. त्यामुळे पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे यथोचित असून, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जगभरात उल्लेख केला जाईल, अशी भावना यावेळी मंत्रिमंडळात व्यक्‍त करण्यात आली .
दरम्यान, उत्तरमहाराष्ट्रविद्यापीठालाबहिणाबाईचौधरीयांचेनावदेण्याचीमागणीहीयावेळीमंत्रिमंडळातकरण्यातआली. सोलापूरविद्यापीठालास्वामीरामानंदतीर्थविद्यापीठ, असेनावदेण्याचीसूचनाकरण्यातआलेलीअसली, तरीनांदेडविद्यापीठालास्वामीरामानंदतीर्थयांचेनावअसल्यानेहानिर्णयघेण्यातआलानसल्याचेसूत्रांनीसांगितले.